IPL मध्ये धमाकेदार पदार्पण केल्यापासून वैभव प्रत्येक स्पर्धा गाजवताना दिसला आहे. ICC U19 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला ट्रिपल धमाका करण्याची संधी असेल.
यंदाच्या U19 वर्ल्ड कप स्पर्धेत वैभव सूर्यवंशी एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करू शकतो.
सध्याच्या घडीला हा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या बेबी एबी अर्थात डेवॉल्ड ब्रेविसच्या नावे आहे. त्याने २०२२ च्या हंगामात १८ षटकार मारले होते.
U19 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम स्ट्राईक रेटचा विक्रम गब्बर शिखर धवनच्या नावे आहे. २००४ च्या हंगामात त्याने ९३.५१ च्या स्ट्राईक रेटनं धावा काढल्या होत्या.
वैभव सातत्याने कमालीच्या स्ट्राईक रेटनं धावा काढताना दिसते. त्यामुळे धवनचा हा विक्रमही यावेळी मोडीत निघू शकतो.
अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ५६६ धावांचा विक्रम हा सरफराज खानच्या नावे आहे.
यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशी किमान ७ सामने खेळेल, यात तो सरफराजलाही मागे टाकू शकतो.