लिलावात सर्वात वयस्क खेळाडू कोण?
दक्षिण आफ्रिकेचा ड्वेन प्रिटोरियस हा मिनी लिलावातील वयस्क खेळाडूंपैकी एक आहे. ३७ वर्षीय खेळाडूची बेस प्राइज १ कोटी इतकी आहे.
भारताचा लेग स्पिनर कर्ण शर्मा वयाच्या ३८ व्या वर्षी लिलावात उतरला आहे. गत हंगामात MI कडून खेळताना दिसला होता.
२०१४ च्या हंगामात कर्ण शर्मा हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला होता. SRH च्या संघाने त्याच्यासाठी ३.७५ कोटी रुपये मोजले होते.
गत हंगामात CSK कडून छाप सोडणारा इंग्लंडचा ३८ वर्षीय जलदगती गोलंदाज रिचर्ड ग्लीसन याने ७५ लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली आहे.
यंदाच्या लिलावातील वयस्क खेळाडूंच्या यादीत भारताच्या उमेश यादवचाही समावेश होतो.३८ वर्षीय गोलंदाजची बेस प्राइज १.५ कोटी एवढी आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू जलज सक्सेना हा यंदाच्या लिलावातील सर्वात वयस्क खेळाडू आहे. ३९ वर्षीय खेळाडूनं ४० लाख मूळ किंमतीसह लक आजमावणार आहे.