एक नजर या या खास रेकॉर्डवर
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल सर्वात आघाडीवर आहे.
कॅरेबियन स्फोटक बॅटरनं आपल्या कारकिर्दीत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ३३ सामन्यात ६३ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
भारताचा माजी टी-२० वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
रोहित शर्मानं आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत ४७ सामन्यात ५० षटकार मारले आहेत.
इंग्लंडचा जोस बटलर या यादीत ३५ सामन्यातील ४३ षटकारासह तिसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक सलामीवीर डेविड वॉर्ननंर आपल्या टी-२० कारकिर्दीत ४२ सामन्यात वर्ल्ड कप स्पर्धेत ४० षटकार मारले आहेत.
क्रिकेट जगतातील किंग आणि रनमशिन या नावाने ओळखला जाणारा विराट कोहलीही या यादीत आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये आहे.
किंग कोहलीनं आपल्या आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत वर्ल्ड कप स्पर्धेत ३५ सामन्यात ३५ षटकार मारले आहेत.