आकडेवारीसह जाणून घ्या सविस्तर
IPL मध्ये रोहित शर्मानं एका फ्रँचायझी संघाविरुद्ध तर विराट कोहलीनं दोन संघाविरुद्ध अजून सामनावीर पुरस्कारच जिंकलेला नाही.
इथं जाणून घेऊयात या यादीत IPL मधून निवृत्ती घेतलेल्या दोन दिग्गजांचाही समावेश आहे.
आयपीएलमध्ये रविचंद्रन अश्विन याने MI विरुद्ध सर्वाधिक ३७ सामने खेळले. पण एकदाही त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकता आला नाही.
विराट कोहली MI विरुद्ध ३४ आणि RR विरुद्ध ३३ सामने खेळला. पण या संघाविरुद्ध मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याची त्याची पाटी कोरीच आहे.
दिनेश कार्तिक या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. CSK विरुद्ध ३३ सामन्यात त्याला एकदाही मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा डाव साधता आला नाही.
रोहित शर्मा IPLमध्ये RR विरुद्ध ३० सामन्यात एकदाही मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरलेला नाही.
भुवनेश्वर कुमारने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ३० सामने खेळूनही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकलेला नाही.