न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा हिटमॅन रोहित शर्माच्या नावे आहे.
रोहित शर्मानं आपल्या टी-२० कारकिर्दीत न्यूझीलंडविरुद्ध १७ सामन्यात ३४.०६ च्या सरासरीसह ५११ धावा केल्या आहेत.
या यादीत लोकेश राहुल ४६ च्या सरासरीसह ३२२ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या तो टी-२० संघाचा भाग नाही.
विराट कोहलीनं टी-२० कारकिर्दीत न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात ३११ धावा काढल्या आहेत. त्याने कसोटीसह या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.
भारतीय टी-२० संघाचा विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादवनं आतापर्यंतच्या कारकिर्दीत न्यूझीलंडविरुद्ध ८ टी-२० सामन्यात २८४ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
घरच्या मैदानातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत तो अगदी सहज विराट कोहलीसह लोकेश राहुलच्या पुढे निघून जाऊ शकतो.
श्रेयस अय्यरचाही या यादीत आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या १३ टी-२० सामन्यात २२५ धावा काढल्या आहेत.