कोहलीसह कोण कोणत्या स्थानी?
विराट कोहलीनं रांचीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात वनडे कारकिर्दीतील ५२ वे शतक झळकावले.
या खेळीसह तो आता वनडेतील 'सेंच्युरी किंग' झाला आहे. वनडेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वलस्थानी आहे.
त्याच्या पाठोपाठ या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव येते. शंभर शतकांच्या बादशहानं वनडेत ४९ शतके झळकावली आहेत.
हिटमॅन रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने ३३ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या यादीत ३० शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेचा दिग्गज डावुखरा बॅटर सनथ जयसूर्या याने आपल्या वनडे कारकिर्दीत २८ शतके झळकावली आहेत.