कोहलीसह केएल राहुलही या यादीत
टी-२० क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक सरासरीसह धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिलक वर्मानं कमालीचा रेकॉर्ड नोंदवला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात नाबाद २५ धावांची खेळीनंतर तिलक वर्माची या संघाविरुद्धची टी-२० तील सरासरी ७०.५० इतकी झाली आहे.
याआधी भारताकडून एका संघाविरुद्ध टी-२० मध्ये सर्वोच्च सरासरीचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावे होता. (कमीत कमी ३०० धावा)
विराट कोहलीनं पाकिस्तान विरुद्ध ७०.२८ आणि श्रीलंकेविरुद्ध ६७.८ च्या सरासरीसह धावा काढल्याचा रेकॉर्ड आहे.
केएल राहुलनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० सामन्यात ५८.८३ च्या सरासरीनं धावा काढल्याची नोंद आहे.
किंग कोहलीनं वेस्ट इंडिज विरुद्ध ५७ च्या सरासरीसह धावा केल्याचाही रेकॉर्ड आहे.
कोहलीचा दबदबा असणाऱ्या प्रांतात आता तिलक वर्मा भारी ठरताना दिसतोय.