तिलक वर्मानं रचला नवा इतिहास
तिलक वर्मानं अहमदाबादच्या मैदानात GT विरुद्धच्या सामन्यात अवघ्या ४५ चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील पहिले वहिले शतक साजरे केले.
या शतकी खेळीसह तो मुंबई इंडियन्सकडून सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तरित्या अव्वलस्थानी पोहचला आहे.
२००८ च्या पहिल्या हंगामात CSK विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या सनथ जयसूर्यानं मुंबई इंडियन्सकडून ४५ चेंडूत शतक साजरे केले होते.
२०२३ च्या हंगामात कॅमरून ग्रीन याने MI च्या ताफ्यातून खेळताना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ४७ चेंडूत शतक ठोकल्याचा रेकॉर्ड आहे.
२०२३ च्या हंगामात सूर्यकुमार यादवनं गुजरात टायटन्सविरुद्ध वानखेडेच्या मैदानात ४९ चेंडूत शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले होते.
२०१२ मध्ये रोहित शर्मानं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून ५२ चेंडूत शतक झळकावले होते.