या यादीत पांड्यासह कांबळीचंही नाव
अनेक क्रिकेटर मैदानातील कामगिरीशिवाय मैदानाबाहेरील प्रेमाच्या खेळामुळे चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले आहे.
इथं एक नजर टाकुयात अशा क्रिकेटर्सवर जे लग्नाआधीच पार्टनरने दिलेल्या 'गूडन्यूज'मुळे चर्चेत राहिले
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांचे प्रेम प्रकरण चांगलेच गाजले. नताशाने लग्नाधीच पहिल्या अपत्याला जन्म दिला होता.
ट्रॅविस हेडची पत्नी जेसिकाने २०२२ मध्ये पहिल्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर २०२३ मध्ये ही जोडी लग्नबंधानात अडकली.
डेविड वॉर्नर आणि कँडिस वॉर्नर यांनीही लग्नाआधीच पहिल्या अपत्याला जन्म दिला होता.
जो रुटनं २०१६ मध्ये कॅरी कॉट्रेलसोबत साखरपुडा उरकला. २०१८ मध्ये लग्नाआधीच २०१७ मध्ये ही जोडी आई-बाबा झाले.
विनोद कांबळीही या यादीत आहे. त्याची दुसरी पत्नी आंद्रियाने लग्नाधाधीच मुलाला जन्म दिला होता.
कॅरेबियन स्टार विवियन रिचर्ड्स आणि बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांचे अफेअर चांगलेच गाजले. मसाबा ही या दोघांची मुलगी आहे.