क्रिकेटमध्ये मग्न केले नाही लग्न!
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार आणि क्रिकेट जगतातील यशस्वी बॅटर मिताली राज ही वयाच्या ४२ व्या वर्षीही अविवाहित आहे.
क्रिकेटमध्ये मग्न असल्यामुळे तिनं लग्नाचं फार मनावर घेतलं नाही. देशासाठी खेळणं हीच प्राथमिकता होती, मितालीनं एका मुलाखतीत सांगितले होते.
अंजुम चोप्रा हा देखील महिला क्रिकेटमधील लोकप्रिय चेहरा आहे. तिने भारतीय संघाचे नेतृत्वही केलं आहे. वयाच्या ४८ व्या वर्षीही ती सिंगल आहे.
आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी बोलणारी ही माजी क्रिकेटर आजही कॉमेंटटरच्या रुपात क्रिकेटशी कनेक्टेड आहे.
भारताची माजी फिरकीपटू आणि महिला निवड समितीच्या विद्यमान अध्यक्ष नीतू डेविड यांनीही लग्नाला पसंती देण्यापेक्षा क्रिकेटवर प्रेम जपल्याचे दिसते.
महिला क्रिकेटमध्ये स्विंग आणि स्पीडच्या जोरावर गोलंदाजीत अधिराज्य गाजवणारी झुलन गोस्वामी देखील ४२ व्या वर्षी सिंगलच आहेच.
क्रिकेट हेच तिचं पहिलं आणि शेवटच प्रेम असल्याचे चित्र तिच्या आतापर्यंतच्या प्रवासात दिसून येते.