एक नजर त्याच्या फिटनेस रुटीनवर...
टी-२० क्रिकेटमधील बिग सिक्स हिटर अभिषेक शर्मा हिट अँण्ड फिट राहण्यासाठी कठोर मेहनत घेतो.
इथं जाणून घेऊयात सडपातळ बांधा असूनही षटकार किंगच्या तोऱ्यात मिळवणाऱ्या अभिषेक शर्माच्या फिटनेसची खास गोष्ट
अभिषेक शर्माच्या दिवसाची सुरुवात ही पहाटे चार वाजल्यापासून होते.
शांत, संयमी आणि मानसिकदृष्ट्या कणखर राहण्यासाठी तो दररोज अर्धा तास मेडिटेशन करतो.
मैदानात तग धरण्याची क्षमता वाढवण्यासाठी दररोज ४५ मिनिटे स्विमिंग हा त्याच्या फिटनेस रुटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे.
जिममध्ये तो ताकद आणि सहनशक्ती वाढवणाऱ्या व्यायामावर भर देतो. ज्यामुळे त्याला मैदानात उत्तुंग फटकेबाजी करणं सहज सोपे होते.
अभिषेक हा युवीच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्या आहे. त्याचाही त्याला फायदा झाल्याचे दिसते.