SENA देशांत सूर्या दादाचा जलवा! रोहितचा सर्वाधिक सिक्सरचा विक्रम मोडला

आघाडीच्या भारतीय बॅटर्सचा रेकॉर्ड

सूर्यकुमार यादव याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियन मैदानात सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

या आधी SENA देशांत T20I मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हिटमॅन रोहित शर्माच्या नावे होता. सूर्यानं त्याचा विक्रम मोडीत काढला आहे.

इथं एक नजर टाकुयात भारतीय संघाकडून SENA देशांत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय संघातील फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर

सूर्यकुमार यादवनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या सामन्यात २ षटकार मारले. या षटकारांसह त्याच्या खात्यात SENA देशांत ४३ षटकारांची नोंद झाली आहे.

रोहित शर्मानं आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत SENA देशांत ४१ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.

विराट कोहलीनं आपल्या T20I कारकिर्दीत SENA देशांत ३० षटकार ठोकले आहेत. तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

युवराज सिंगनं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानात खेळताना T20I मध्ये एकूण २६ षटकार मारले आहेत.

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या जोडीनं SENA देशांत प्रत्येकी २२-२२ षटकार मारले आहेत.

Click Here