एक नजर बॅटिंगमधील खास रेकॉर्डवर
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अनकॅप्ड भारतीय सलामीवीर प्रभसिरमन सिंग याने तुफान फटकेबाजी केली.
पॉवरप्लेमध्ये २३ चेंडूत ७१ धावांची खेळी करत त्याने पहिल्या ६ षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत टॉप ५ मध्ये एन्ट्री मारली.
या यादीत IPL स्पेशलिस्ट सुरेश रैना अव्वलस्थानी आहे. २०१४ च्या हंगामात पंजाबविरुद्ध त्याने २५ चेंडूत ८७ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
२०२४ च्या हंगामात SRH च्या ट्रॅविस हेडनं DC विरुद्ध २६ चेंडूत ८४ धावा कुटल्या होत्या.
DC कडून जेक फ्रेसर-मॅकगर्क याने २०२४ च्या हंगामात MI विरुद्ध पॉवर दाखवताना २४ चेंडूत ७८ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
२००९ च्या सेमीफायनलमध्ये ॲडम गिलख्रिस्टनं डेक्कन चार्जर्सकडून दिल्लीच्या संघाविरुद्ध २५ चेंडूत ७४ धावा कुटल्या होत्या.