एक नजर कसोटीतील बेस्ट रेकॉर्ड्वर
इंग्लंडच्या मैदानातील सातत्यपूर्ण कामगिरीसह केएल राहुलनं खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
मँचेस्टरच्या मैदानातील क्लास खेळीनंतर केएल राहुल आता सुनील गावसकर यांच्या पंक्तीत बसला आहे.
परदेशातील मैदानात डावाची सुरुवात करताना एका कसोटी मालिकेत ५०० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केलाय.
याआधी सुनील गावसकर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेत ७७४ धावा तर १९७९ मध्ये इंग्लंड दौऱ्यात ५४२ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
लोकेश राहुलनं मँचेस्टर कसोटीतील क्लास खेळीसह इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत ५०० पेक्षा अधिक धावांचा पल्ला पार केला आहे.
सलामीवीर व्यतिरिक्त शुबमन गिलचाही या यादीत समावेश होता. गिलनं इंग्लंड दौऱ्यात मँचेस्टर कसोटीतील दुसऱ्या डावात ६९७* धावांपर्यंत मजल मारली.
परदेशातील कसोटीत ५०० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दिलीप सरदेसाई यांचाही समावेश होतो.