महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सिक्सरचा रेकॉर्ड
महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्यात न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन सर्वात आघाडीवर आहे.
सोफीनं २००९-२५ या कालावधीत २९ सामन्यातील २५ डावात २३ षटकार मारले आहेत.
वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन २९ सामन्यातील २८ डावात २२ षटकारांसह दुसऱ्या स्थानार असल्याचे दिसते.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं २००९-२५ या कालावधीत ३० सामन्यातील २६ डावात २० षटकार मारले आहेत.
दक्षिण आफ्रिकेची लिझेल ली हिने २०१७-२२ या कालावधीत १४ सामन्यात १४ डावात १२ षटकार मारले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील क्लोई ट्रायॉन हिने २०१३-२५ या कालावधीत २२ सामन्यातील १८ डावात १२ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
भारताची स्फोटक बॅटर स्मृती मानधना हिने २०१७-२५ या कालावधीत २० सामन्यातील २० डावात १२ षटकार खेचल्याचा रेकॉर्ड आहे.