लग्न मोडल्यावर स्मृती मानधनाने पहिल्यांदाच केलं फोटोशूट
महिला क्रिकेटची क्वीन स्मृती मानधनाच्या आयुष्यात महिन्याभरात बरीच उलथापालथ झाली
प्रियकर पलाश मुच्छलशी स्मृतीचा होणारा विवाह ऐन लग्नाच्या दिवशी स्थगित करावा लागला
अनेक तर्कवितर्क लढवले गेल्यानंतर १५ दिवसांनी तिने विवाह मोडल्याची घोषणा केली.
या कठीण काळातून ती हळूहळू सावरतेय आणि क्रिकेटच्या मैदानात परतण्यास उत्सुक आहे.
या विचित्र आणि कठीण काळाबाबत कोणतेही भाष्य करण्यापेक्षा तिने एक फोटोशूट केलं आहे.
फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगतात. त्यालाच तिने 'आयुष्याची झलक' म्हटले आहे.