महिला वर्ल्ड कप स्पर्धेत या खास विक्रमांवर असतील स्मृतीच्या नजरा

एक नजर स्मृतीला खुणावणाऱ्या रेकॉर्ड्स बद्दल

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत स्मृती मानधनाला अनेक विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. 

स्मृती मानधनाला वनडेत सर्वात कमी डावात ५००० धावांचा टप्पा गाठण्याचा अगदी उंबरठ्यावर आहे. 

२०२१ मध्ये वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरनं पाक विरुद्ध १२९ डावात हा डाव साधला होता. ११० डावानंतर स्मृती या कामगिरीपासून फक्त ८१ धावा दूर आहे.

हा टप्पा गाठताच महिला वनडे क्रिकेटमध्ये सलामीच्या बॅटरच्या रुपात ५ हजार धावा करणारी ती न्यूझीलंडच्या सुझी बेट्सनंतर दुसरी बॅटर ठरेल.

वनडेत एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्डही तिच्या टप्पात आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत तिने ९५९ धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात १२ धावा करताच १९९७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कनं १६ सामन्यात ९७० धावा केल्याचा रेकॉर्ड ती मागे टाकेल.

यंदाच्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील दमदार कामगिरीसह हजार धावांचा टप्पा गाठत कॅलेंडर ईयरमध्ये हजार धावा करणारी ती पहिली महिला बॅटरही ठरू शकते.

एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक ४ शतकांचा विक्रम तिच्याच नावे आहे. २०२४ च्या कामगिरीत सुधारणा करून ती यात सुधारणाही करू शकते. 

Click Here