स्मृतीनं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
वनडे 'क्वीन' स्मृती मानधना निर्धारित ५० षटकांच्या सामन्यात एका वर्षात सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
यंदाच्या वर्षात स्मृती मानधनाच्या भात्यातून ३२ षटकार पाहायला मिळाले आहेत. हा एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
इथं एक नजर टाकुयात वनडेत एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या ५ महिला बॅटर्सच्या खास रेकॉर्डवर
२०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल ली हिने एका कॅलेंडर ईयरमध्ये २८ षटकार मारले होते. जवळपास सात वर्षांनी स्मृतीनं तिचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.
वेस्ट इंडिजच्या डिआंड्रा डॉटिन हिने २०१३ या वर्षांत २१ षटकार ठोकल्याचे पाहायला मिळाले होते.
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील क्लोई ट्रायॉन हिने २१ षटकार मारत २०१७ चं वर्ष गाजवलं होते.
श्रीलंकेच्या चामरी अटापट्टू हिने २०१३ मध्ये एका कॅलेंडर ईयरमध्ये २१ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.