एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांची यादी
ओव्हलच्या मैदानातील अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल याने आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
इंग्लंडच्या मैदानात खेळाडूच्या रुपात सपशेल अपयशी ठरलेल्या गिलनं 'सेनापती' होताच इथं धावांची 'बरसात' केलीये.
लिटल मास्टर सुनील गावसकर यांना मागे टाकत शुबमन गिल एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीत गिलनं ७३३ धावांचा आकडा गाठताच गावसकरांचा ४५ वर्षांहून अधिककाळ अबाधित असणारा विक्रम मोडित निघाला.
सुनील गावसकर यांनी १९७८-७९ मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करताना वेस्ट इंडिज विरुद्ध एका मालिकेत ७३२ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
विराट कोहलीनं २०१६-१७ मध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना इंग्लंड विरुद्ध एका कसोटी मालिकेत ६५५ धावा केल्याचे पाहायला मिळाले होते.
२०१७-१८ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीनं कॅप्टन्सी करताना ६१० धावा केल्या होत्या.
२०१८ च्या इंग्लंड दौऱ्यातही कोहलीच्या भात्यातून एका कसोटी मालिकेत ५९३ धावा आल्या होत्या.