शेफालीनं आधी स्मृतीला मागे टाकले, आता तिच्या मैत्रीणीचाही रेकॉर्ड मोडला
एक नजर तिच्या खास कामगिरीवर
'लेडी सेहवाग' नावाने ओळखली जाणारी शेफाली वर्मा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे.
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाल्यावर तिने फायनलमध्ये धमाकेदार खेळीसह संघाला विश्व चॅम्पियन करण्यात मोलाचा वाटा उचलला.
आता श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत तिने कामगिरीत सातत्य कायम राखत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
तिरुवनंतपुरमच्या मैदानातील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तिने सलग दुसरे अर्धशतक झळकावले.
या सामन्यातील नाबाद ६९ धावांच्या कामगिरीसह ती श्रीलंकेविरुद्ध भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी बॅटर ठरली आहे.
या आधी श्रीलंकेविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड जेमिमाच्या नावे होता. २०२२ मध्ये तिने श्रीलंकन महिला संघाविरुद्ध ७६ धावांची खेळी केली होती.
श्रीलंकेविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेतील विशाखापट्टणमच्या मैदानातील पहिल्या टी-२० सामन्यात जेमिमानं नाबाद ६९ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या याच मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात शेफाली वर्मानं ३४ चेंडूत ६९ धावांची खेळी केल्याचेही पाहायला मिळाले होते.
दुसऱ्या टी-२० सामन्यात शेफाली वर्मानं आठव्यांदा प्लेऑफ अवार्ड जिंकत स्मृती मानधनाला मागे टाकले होते.