सारा तेंडुलकर ही क्रिकेटपटूंच्या स्टारकिड्सपैकी सर्वाधिक चर्चेत असलेली सेलिब्रिटी आहे. साराने आपल्या ग्लॅमरस लूकने नेहमीच वाहवा मिळवलीये.
सारा तेंडुलकर सध्या लंडनमध्ये आहे. ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत धमाल मजामस्ती करत आहे. तसे फोटोही साराने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सारा तेंडुलकर नुकतीच एका इव्हेंटला गेली होती. युवराज सिंगच्या 'यू व्ही कॅन' संघटनेचा हा चॅरिटी इव्हेंट होता. त्यात सारा कुटुंबासोबत हजर होती.
या इव्हेंटसाठी तिने पांढऱ्या रंगाचा वन पीस ड्रेस घातला होता. खास वन-साइडेड ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सारा खूरच सुंदर दिसत होती.
सारा ज्या इव्हेंटमध्ये गेली होती, तेथेच शुबमन गिलदेखील आला होता. त्यामुळे या दोघांच्या रिलेशनशिप आणि अफेअरच्या पुन्हा चर्चा रंगल्या.
साराने याच आऊटफिटमधले आपल्या मैत्रिणींसोबतचे सेल्फी आणि फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. चाहत्यांनाही फोटो खूप आवडलेत.
इव्हेंटनंतर सारा मैत्रिणींसह लग्नाला गेली. त्यामुळे साराने फोटोंना "तुझी नवरी नाही" असे कॅप्शन दिले. या अजब कॅप्शनची सध्या चर्चा रंगलीये.