खास फ्रेममध्ये कोण कोण दिसलं?
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या साखरपुड्याची गोष्ट चर्चेत असताना सारा तेंडुलकरने इस्टा स्टोरीच्या माध्यमातून खास स्टोरी शेअर केलीये.
सारानं शेअर केलेल्या खास व्हिडिओत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नारळ फोडताना दिसतोय. या फ्रेममध्ये सारासह अंजलीची झलक दिसते.
मुंबईतील अंधेरी येथे सारानं पिलेट्स अकादमी सुरु केलीये. हीच आनंदाची गोष्ट तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केलीये.
सारानं या अकादमीतील जे फोटो शेअर केलेत त्यात सानियाचीही झलक दिसून येते.
या अकादमीत Joseph Pilates यांनी विकसित केलेल्या व्यायाम पद्धतीच्या माध्यमातून फिटनेस प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सारा ही फिटनेसवर भर देणाऱ्या लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. आता अकादमीच्या माध्यमातून ती या क्षेत्रात सक्रीय झालीये.