...अन् संजूची १०८ मिनिटांची इनिंग ठरली जगात भारी

एक नजर खास रेकॉर्डवर

ईडन गार्डन्सच्या मैदानातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याने आपल्या कारकिर्दीतील अविस्मरणीय खेळी केली. 

भारतीय संघाला सेमीच तिकीट मिळवून देणाऱ्या  ९७ धावांच्या नाबाद खेळीत त्याने अनेक विक्रमही प्रस्थापित केले. 

यात १८० मिनिटांतील खास विश्वविक्रमाचाही समावेश आहे. इथं जाणून घेऊयात सविस्तर 

वेस्ट इंडिज विरुद्ध संजूने नाबाद ९७ धावांची खेळी साकारताना १०८ मिनिटे बॅटिंग केली. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक वेळ बॅटिंग करण्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

या यादीत जॉर्ज मुन्से दुसऱ्या स्थानी आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने १०६ मिनिटे फलंदाजी करताना ६६ धावांची नाबाद खेळी केली होती. 

डेवॉन कॉन्वे याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ९२ धावांची खेळी करताना १०६ मिनिटे फलंदाजी केली होती. हा रेकॉर्ड संजूने मोडीत काढला

पथुम निसंका याने ऑयर्लंड, युएई आणि नामिबिया विरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेत तीन वेळा १०५ मिनिटे फलंदाजी केली आहे. 

Click Here