साई सुदर्शनसह मँचेस्टर टेस्टमधील तिसऱ्या क्रमांकावरील ५ बेस्ट इनिंग्स

पहिल्या अर्धशतकासह खास क्लबमध्ये झाली एन्ट्री

करुण नायरच्या जागी मिळालेल्या संधीचं सोनं करताना साई सुदर्शन याने मँचेस्टरच्या मैदानात कसोटीतील पहिले अर्धशतक साजरे केले.

इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात साई सुदर्शन याने पहिल्या डावात  ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

भारतीय खेळाडूनं ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात तिसऱ्या क्रमांकावर केलेली ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी ठरली.

इंग्लंडच्या या मैदानात भारताकडून अब्बास अली बेग यांनी १९५९ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ११२ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.

संजय मांजरेकर यांनी १९९० मध्ये दुसऱ्या डावात या मैदानात ९३ धावांची खेळी केली होती. 

१९३७ मध्ये भारताचे माजी कसोटीपटू कोटाह रामास्वामी यांनी या मैदानात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ६० धावांची खेळी केली होती.

१९९० मध्ये संजय मांजरेकर यांनी  चौथ्या डावात ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ५० धावांची खेळी केल्याचा रेकॉर्डही आहे.

Click Here