रिकल्टन ते सूर्या! मुंबई इंडियन्सकडून सर्वात जलद शतक झळकवणारे ५ फलंदाज

टॉप ५ मध्ये दिसत नाही हिटमॅनचं नाव

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रायन रिकल्टन याने IPL मधील पहिले शतक झळकावताना अनेक विक्रम नोंदवले. 

अवघ्या ४४ चेंडूत शतक साजरे करत तो MI कडून सर्वात जलद शतक झळकवणारा फलंदाज ठरला. 

इथं एक नजर टाकुयात रिकल्टनसह आघाडीच्या पाच फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर

२००८ च्या हंगामात MI कडून सनथ जयसूर्यानं CSK विरुद्ध ४५ चेंडूत शतक ठोकले होते. 

२०२६ च्या हंगामात तिलक वर्मानं GT विरुद्ध ४५ चेंडूत शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले.

कॅमरून ग्रीन याने २०२३ च्या हंगामात MI कडून खेळताना SRH विरुद्ध ४७ चेंडूत शतक साजरे केल्याचा रेकॉर्ड आहे.

सूर्यकुमार यादवही या यादीत आहे. त्याने २०२३ च्या हंगामात GT विरुद्ध ४९ चेंडूत शतक ठोकले होते. 

Click Here