ऋतुराजची टॉप ३ मध्ये एन्ट्री, MS धोनी अजूनही टॉपला 

CSK कडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात मॅच विनिंग अर्धशतक झळकावले.

MI विरुद्ध ऋतुराज गायकवाडने ४८ चेंडूत ६७ धावांची नाबाद खेळी साकारताना खास विक्रमालाही गवसणी घातली. 

या खेळीसह IPL मध्ये CSK कडून  सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फाफ ड्युप्लेसिसला मागे टाकत तो अव्वल ३ मध्ये पोहचला आहे. 

रवींद्र जडेजानं आपल्या कारकिर्दीत चेन्नई सुपर किंग्सकडून १८६ सामन्यात ५ अर्धशतकासह २१९८ धावा केल्या असून तो टॉप ५ मद्ये असल्याचे दिसते.

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फाफ ड्युप्लेसिसनं CSK साठी IPL मध्ये २७२१ धावा केल्या आहेत. ऋतुराजने त्याला मागे टाकले आहे.

ऋतुराज गायकवाडच्या खात्यात आता ८० सामन्यात २ शतके आणि २२ अर्धशतकासह २७४७ धावा जमा आहेत.

सुरेश रैना या यादीत १७६ सामन्यात ३३ अर्धशतक आणि एका शतकासह ४६८७ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

MS धोनी २४८ सामन्यात २२ शतकासह ४८६५ धावांसह या यादीत टॉपला आहे.

Click Here