इथं पाहा T20I मधील शतकी रेकॉर्ड
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हिटमॅन रोहित शर्मासह ग्लेन मॅक्सवेलनं प्रत्येकी ५-५ शतके झळकावली आहेत.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने ११५ डावात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५ शतके झळकावली आहेत. त्यामुळे या यादीत तो अव्वलस्थानी आहे.
नाबाद १४५ धावा ही ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
रोहितनं टी-२० कारकिर्दीतील १५१ डावात ५ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. नाबाद १२१ धावा ही त्याची या फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
इंग्लंडच्या फिल सॉल्टनंही छोट्या फॉरमॅटमध्ये मोठा धमाका करून दाखवला आहे. त्याच्या खात्यातही आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ४ शतकांची नोंद आहे.
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने छोट्या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत ४ शतके झळकावली आहेत.
सध्याच्या घडीला सूर्यकुमार यादवधावांसाठी संघर्ष करताना दिसते. संघर्ष संपवून तो शतकासह मॅक्सवेलसह रोहितच्या बरोबरीचा डाव साधू शकतो.