इथं जाणून घ्या तो खास रेकॉर्ड
हिटमॅन रोहित शर्मानं टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त वनडे खेळताना दिसेल.
या दौऱ्यात मैदानात उतरताच रोहित शर्माच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होईल.
आतापर्यंत रोहित शर्मानं ४९९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ५०० चा पल्ला गाठण्यासाठी फक्त तो एक मॅच दूर आहे.
रोहित आधी फक्त भारताकडून चौघांनी हा पल्ला गाठला आहे. एक नजर टाकुयात त्या रेकॉर्डवर
सचिन तेंडुलकर या यादीत सर्वात टॉपला आहे. १९८९ ते २०१३ या कालावधीत ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
विराट कोहलीनं २००८ पासून आतापर्यंत ५५० आंतरराष्ट्रीय सामने खेळल्याचा रेकॉर्ड आहे.
महेंद्रसिंह धोनीनं आपल्या कारकिर्दीत एकूण ५३५ आंतरराष्ट्रीय सामने खेळल्याचा रेकॉर्ड आहे.
राहुल द्रविड यानेही भारताकडून ५०४ आंतरराष्ट्रीय खेळले आहेत. त्याच्यापाठोपाठ रोहित ५०० आंतरारष्ट्रीय सामना खेळणारा पाचवा भारतीय ठरेल.