वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय
भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ५९ व्या अर्धशतकासह सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडीत काढला.
३८ वर्षीय रोहित शर्मा वनडेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
इथं एक नजर टाकुयात वनडेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ फलंदाजांवर
सचिन तेंडुलकरनं आपल्या वनडे कारकिर्दीत ४६३ सामन्यात १८ हजार ४२६ धावा केल्या आहेत. भारताकडूनच नव्हे क्रिकेट जगतात तो अव्वल आहे.
विराट कोहलीनं आतापर्यंतच्या २७५ वनडे सामन्यात १४ हजार १८१ धावा काढल्या आहेत.
सौरव गांगुलीनं आपल्या वनडे कारकिर्दीत ३०८ सामन्यात ११ हजार २२१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
राहुल द्रविडनं आपल्या वनडे कारकिर्दीत ३४० सामने खेळताना भारताकडून १० हजार ७६८ धावा केल्या आहेत.