IPL च्या इतिहासात सर्वात महागडे ठरलेले १० खेळाडू

कॅमरून ग्रीनची टॉप ३ मध्ये एन्ट्री

रिषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. २०२५ च्या मेगा लिलावात LSG नं त्याच्यावर २७ कोटींची बोली लावली होती.

२०२५ च्या लिलावात श्रेयस अय्यरसाठी पंजाब किंग्जच्या संघाने २६.७५ कोटी रुपये मोजले होते. 

ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील तिसरा महागडा खेळाडू ठरला.  २०२६ च्या मिनी लिलावात KKR त्याच्यावर २५.२० कोटींची बोली लावली. 

२०२४ च्या लिलावात ऑस्ट्रेलियन मिचेल स्टार्कवर कोलकाताने २४.७५ कोटी रुपयांची बोली लावली होती.

व्यंकटेश अय्यर या यादीत आघाडीच्या पाचमध्ये आहे. २०२५ च्या मेगा लिलावात KKR नं त्याच्यासाठी २३.७५ कोटी रुपये मोजले होते.

२०२४ च्या लिलावात हैदराबादच्या संघाने ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्ससाठी २०.५० कोटी एवढा पैसा खर्च केला होता.

इंग्लंडचा ऑलराउंडर सॅम कुरेन १८.५० कोटींसह या यादीतसातव्या क्रमांकावर आहे. २०२३ च्या हंगामात पंजाबने त्याच्यावर मोठी बोली लावली होती.

पंजाब किंग्जच्या संघाने २०२५ च्या मेगा लिलावात अर्शदीप सिंगवर १८ कोटींचा डाव खेळल्याचे पाहायला मिळाले होते.

पंजाबच्या संघाने २०२५ च्या मेगा लिलावात  युझवेंद्र चहलवर  १८ कोटींची बोली लावली होती. 

२०२६ मिनी लिलावात बेबी मलिंगा मथीशा पथिरना याच्यावर KKR नं १८ कोटींचा डाव खेळला. 

Click Here