जाणून घ्या या सुंदरीसंदर्भातील खास गोष्ट
भारत-बांगलादेश यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत BBLमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्पोर्ट्स अँकर रिधिमा पाठक चर्चेत आली आहे.
स्पोर्ट्स अँकरच्या रुपात खास छाप सोडणाऱ्या रिधिमा पाठक हिने पैशांपेक्षा देश महत्त्वाचा म्हणत बांगलादेश प्रीमियर लीगमधील जॉबवर लाथ मारली.
रिधिमाचा जन्म १७ फेब्रुवारी १९९० झारखंड येथील रांची येथे झाला. ३५ वर्षीय सुंदरी तगडी कमाई करणाऱ्या स्पोर्ट्स अँकरपैकी एक आहे.
स्पोर्ट्स अँकरिंगच्या रुपात छाप सोडण्याआधी तिने मॉडेल, अभिनेत्री आणि व्हाइस आर्टिस्ट आणि टेलिव्हिजनवरील प्रेंजेटटरच्या रुपातही काम केले आहे.
अनुभवाच्या जोरावर एका इवेंटसाठी ती १० ते १५ हजार रुपयांच्या घरात कमाई करते.
वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून तिने तगडी कमाई केली आहे. तिच्या नेटवर्थचा आकडा जवळपास १.८ मिलियन डॉलर म्हणजे १५ कोटींच्या घरात आहे.
इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर तिने क्रीडा क्षेत्रातील खास रुचीमुळे स्पोर्ट्स अँकरच्या रुपात आपली ओळख निर्माण करण्याला पहिली पसंती दिली आहे.
विराट कोहली आणि एबी डिविलियर्स हे या स्पोर्ट्स अँकरचे आवडते क्रिकेटर आहेत.