दोन वेळा आशिया कप जिंकून देणारा कॅप्टन
रोहित शर्मानं २०१८ मध्ये कार्यवाहू कॅप्टनच्या रुपात श्रीलंकेविरुद्धच्या फायनल जिंकत टीम इंडियाला आशिया कप स्पर्धेचं जेतेपद मिळवून दिले होते.
२०१८ मध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील बांगलादेशला पराभूत करत टीम इंडियाने निदाहास ट्रॉफी जिंकली होती.
२०२१ मध्ये तो टीम इंडियाचा नियमित कॅप्टन झाला. २०२३ मध्ये टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वाखाली आठव्यांदा आशिया कप स्पर्धा जिंकली होती.
रोहित शर्मा हा तिसरा भारतीय कर्णधार आहे ज्यानं दोन वेळा टीम इंडियाला आशिया कप स्पर्धा जिंकून दिलीये.
२०२४ मध्ये रोहितच्या नेतृत्वातच भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली.
२०२५ मध्ये न्यूझीलंडला पराभूत करत रोहितच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकल्याचे पाहायला मिळाले.
८ महिन्यात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा खास रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावे आहे.
IPL मध्ये त्याने विक्रमी पाचवेळा तर चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेतील २०१३ च्या हंगामात त्याने MI फ्रँचायझी संघाला ट्रॉफी जिंकून दिल्याचाही रेकॉर्ड आहे.