MI अन् CSK नव्हे हा संघ 'नंबर वन'
RCB फ्रँचायझी ब्रँड व्हॅल्यूच्या यादीत टॉप स्थानावर आहे. या संघाची ब्रँड व्हॅल्यू २६९ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २ हजार ३२७ कोटी रुपयांच्या घरात आहे.
IPL मध्ये सर्वाधिक ५ जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू सुमारे २४२ मिलियन डॉलर अर्थात २ हजार ०९४ कोटी इतकी आहे.
पाच वेळचा IPL चॅम्पियन CSK चा संघ जवळपास २३५ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास २ हजार ०३३ कोटी रुपयांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाची ब्रँड व्हॅल्यू सुमारे २२२ मिलियन डॉलर म्हणजेच १,९१८ कोटी रुपयांच्या घरात आहे.
काव्या मारनचा SRH संघ अव्वल पाचमध्ये असून या संघाची ब्रँड व्हॅल्यू सुमारे १५४ मिलियन डॉलर (१,३३१ कोटी रुपये) इतकी आहे.
दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी संघाची ब्रँड व्हॅल्यू सुमारे १५२ मिलियन डॉलर ( १,३१४ कोटी रुपये) एवढी आहे.
राजस्थान रॉयल्सची ब्रँड व्हॅल्यू सुमारे १४६ मिलियन डॉलर (१,२६२ कोटी रुपये) इतकी आहे.
गुजरात टायटन्सचा संघ ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत १४२ मिलियन डॉलर (१,२२७ कोटी रुपये) आहे.
पंजाब किंग्स नवव्या क्रमांकावर असून या संघाची ब्रँड व्हॅल्यू १४१ मिलियन डॉलर (१,२१९ कोटी रुपये) आहे.
लखनौ सुपर जाएंट्स दहाव्या स्थानावर असून त्यांची ब्रँड व्हॅल्यू सुमारे १२२ मिलियन डॉलर (१,०५४ कोटी रुपये) इतकी आहे.