क्रिकेटरनं शेअर केली ती गोष्ट
लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देण्यात रवींद्र जडेजाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
फलंदाजीसह गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर तो सामनावीर ठरला. हा पुरस्कार त्याने पत्नी आणि आमदार रिवाबा जडेजाला समर्पित केला.
मॅचनंतर जड्डू म्हणाला की, हा पुरस्कार मी गुजरातच्या शिक्षण मंत्री अर्थात रिवाबा जडेजा यांना समर्पित करतो.
या मॅच आधीच पत्नी रिवाबा हिने माझी कामगिरी सामन्याला कलाटणी देणारी ठरेल, अशी भविष्यवाणी केली होती. अगदी तसेच घडले असे जड्डूनं सांगितले.
अवघ्या ७७ धावांवर राजस्थानचा अर्ध संघ तंबूत परतल्यावर जड्डूनं नाबाद ४३ धावांच्या खेळीसह संघाच्या धावफलकावर सन्मानजनक धावसंख्या लावली.
जड्डूनं यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच ४ षटके टाकताना २९ धावा खर्च करताना पूरनच्या रुपात एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली.