राशीद खानचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे ५ गोलंदाज

टॉप ५ मध्ये एकही भारतीय नाही

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने UAE विरुद्धच्या सामन्यात T20I मध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो टॉपला पोहचलाय. 

राशिद खान हा आपल्या कमालीच्या फिरकी गोलंदाजीमुळे 'करामती' खान म्हणूनही ओळखला जातो. त्याने आतापर्यंत १६५ विकेट्स घेतल्या आहेत. 

T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा टीम साउदी १६४ विकेट्स घेत दुसऱ्या स्थानी आहे.

न्यूझीलंडच्या ईश सोधीनं आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १५० विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

बांगलादेशचा शाकिब अल हसन १४९ विकेट्स घेत या यादीत चौथ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते. 

बांगलादेशच्या मुस्ताफिजूर रहमान याच्या खात्यात आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १४२ विकेट्सची नोंद आहे.

Click Here