RCB कॅप्टन रजत पाटीदारची कमाल; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला 

एक नजर कॅप्टन्सीच्या खास रेकॉर्डवर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिली IPL ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रजत पाटीदार याने यंदाच्या हंगामात खास विक्रमाला गवसणी घातली आहे. 

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील RCB नं यंदाच्या हंगामात CSK विरुद्धचा विजयी सिलसिला कायम ठेवत घरच्या मैदानात ४३ धावांनी विजय नोंदवला. 

यंदाच्या हंगामातील विजयाशिवाय RCB च्या संघाने CSK विरुद्ध गत हंगामात दोन दोन सामने जिंकले होते. 

चेन्नई विरुद्धच्या विजयी हॅटट्रिकसह रजत पाटीदारने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा IPL मधील कॅप्टन्सीचा रेकॉर्ड मोडीत काढला. 

सचिन तेंडुलकरच्या कॅप्टन्सीत मुंबई इंडियन्सच्या संघाने २००९-१० च्या हंगामात चेन्नईविरुद्ध सलग दोन विजय मिळवले होते.

रजत पाटीदार हा CSK विरुद्ध सलग तीन सामने जिंकणारा RCB चा दुसरा कर्णधार आहे. 

याआधी अनिल कुंबळे यांनी २००८-९ च्या हंगामात RCB संघाला CSK विरुद्ध सलग तीन सामने जिंकून देण्याचा रेकॉर्ड आहे.

शेन वॉर्न याने पहिल्याच हंगामात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना चेन्नईच्या संघाला सलग तीन वेळा पराभवाचा धक्का दिला होता.

  जॉर्ज बेली याने पंजाबचे नेतृत्व करताना CSK विरुद्ध सलग तीन विजय मिळवल्याचा रेकॉर्ड आहे.

Click Here