I Love U अश्विन! IPL निवृत्तीनंतर फिरकीपटूच्या बायकोची रोमँटिक पोस्ट 

ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतीये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यावर आता आर. अश्विन याने IPL मधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. 

MS धोनीसह CSK च्या ताफ्यातून खेळताना दिसलेला आर. अश्विन याने  एक्स अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत IPL मधून  थांबतोय, असे सांगितले. 

अश्विन चेन्नई सुपर किंग्सशिवाय. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स,  दिल्ली आणि पुणे सुपर जाएंट्स संघाकडून खेळला आहे.

आर. अश्विनच्या IPL निवृत्तीनंतर त्याच्या पत्नीची पोस्ट चर्चेत आलीये. तिने अगदी रोमँटिक अंदाजात नवरोबाच्या निवृत्तीवर मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

"आय लव यू अश्विन... मी आणखी वाट पाहू शकत नाही, असे म्हणत प्रीती नारायन हिने अश्विनच्या हॅपी एन्डिंगमागची नवी स्टोरी शेअर केलीये.

IPL चा प्रवास थांबल्यावर अश्विनला जगभरातील  नव्या प्लॅटफॉर्मवर पाहण्यास उत्सुक असल्याचा उल्लेख प्रीतीनं आपल्या पोस्टमध्ये केलाय. 

 प्रीती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेकदा ती अश्विनचे खास फोटोही शेअर करताना दिसते. 

Click Here