विरुष्का शिवाय या क्रिकेटर्संनी पत्नीसोबत घेतला विम्बल्डनचा आनंद
लंडनमध्ये सुरु असलेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेची क्रिकेटर्समध्येही दिसून येत आहे.
भारतीय क्रिकेटर्संनी परफेक्ट फॉर्मल लूकसह दाखवलेली खास झलकही चर्चेचा विषय ठरत आहे.
विराट कोहली अन् अनुष्का शर्मा या लोकप्रिय कपलनं रॉयल बॉक्समध्ये बसून नोव्हाक जोकोविचच्या मॅचचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पत्नी देविशा शेट्टीसोबत विम्बल्डन स्पर्धेतील सामन्यांचा आनंद घेण्यासाठी पोहचला होता.
दिपक चाहर सुटा बुटात पत्नी जया भारद्वाजसोबत विम्बल्डनचा आनंद घेण्यासाठी सेंटर कोर्टवर पोहचल्याचेही स्पॉट झाले.
लॉर्ड्स कसोटी सामन्याआधी जसप्रीत बुमराहनं संजना गणेशनसोबत टेनिसच्या प्रतिष्ठित स्पर्धेत हजेरी लावली होती.