टॉपर कोण? कुणी किती धावा केल्या?
टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या ११ फलंदाजांमध्ये ३ भारतीयांचा समावेश आहे. पण एकही टॉप ५ मध्ये नाही.
पाकिस्तानचा साहिबजादा याने यंदाच्या हंगामात ६ सामन्यातील ६ डावात ३८३ धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ६ सामन्यातील ६ डावात त्याने २९२ धावांसह यंदाचा हंगाम गाजवला.
न्यूझीलंडचा फिन ॲलन ७ सामन्यातील ७ डावात २८९ धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. फायनलमध्ये ९५ धावांच्या खेळीसह तो टॉपर होऊ शकतो.
दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करम ८ सामन्यातील ८ डावातील २८६ धावांसह या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडच्या टिम सिफर्टनं ७ सामन्यातील ७ डावात २७४ धावा केल्या आहेत.
ईशान किशन याने ८ सामन्यातील ८ डावात २६३ धावा केल्या असून एक मोठी खेळी त्याला ३०० पार पर्यत घेऊन जाऊ शकते.
कॅरेबियन शिमरॉन हेटमायर याने ७ सामन्यातील ७ डावात २४८ धावा कुटल्या आहेत.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव ८ सामन्यातील ८ डावात २४२ धावांसह नवव्या स्थानावर आहे.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने ८ सामन्यातील ८ डावात २३५ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
संजू सॅमसन ४ सामन्यातील ४ डावात २३२ धावांसह ११ व्या स्थानावर असून फायनलमधील दमदार खेळीसह तो आपले स्थान सुधारु शकतो.