MS धोनीला फॉलो करतीये ही पाक महिला क्रिकेटर; नेमकं काय म्हणाली?
कोहलीसाठी झाली RCB ची फॅन
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी पाकिस्तान संघाची कर्णधार फातिमा सना हिने महेंद्रसिंह धोनीसंदर्भात खास गोष्ट बोलून दाखवलीये.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी ती महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
भारतीय संघाला सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला ती प्रेरणास्थान मानते. एका मुलाखतीत तिने ही गोष्ट बोलून दाखवलीये.
वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत संघाचे नेतृत्व मिळाल्यामुळे नर्वस होणं स्वाभाविक आहे. पण धोनीप्रमाणे कूल राहून संघाची धूरा सांभाळण्या तयार आहे, असे ती म्हणाली.
भारतीय संघासह IPL मध्येही MS धोनीची कॅप्टन्सी पाहिलीये. मी तसेच नेतृत्व करायचं ठरवलं आहे. असे फातिमा सना म्हणाली आहे.
विराट कोहली अन् एलिसा पेरी यांच्यासाठी IPL मध्ये आरसीबीच्या संघाची चाहती असल्याचेही पाकिस्तानी महिला संघाच्या कर्णधाराने सांगितले आहे.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान वडिलांच्या निधनानंतरही ती संघासाठी मैदानात उतरली होती.
पाक महिला संघाला आतापर्यंत जे जमलं नाही ते करून दाखवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेन, असा विश्वास तिने व्यक्त केलाय.