अंबानींच्या खास इवेंटमध्ये स्मृतीसह रोहित–सूर्याचा जलवा

इथं पाहा क्रिकेटर्सचा स्टायलिश अंदाज

नीता अंबानी यांनी मुंबईत आयोजित केलेल्या ‘युनायटेड इन ट्रायम्फ’ या कार्यक्रमात  वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेट संघांच्या कर्णधारांना आमंत्रित केले होते.

 रोहित शर्मा आणि  हरमनप्रीत कौरसह भारतीय ब्लाइंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार दीपिका टी.सी. यांची विशेष उपस्थिती होती.

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव या कार्यक्रमात पत्नी देविशासोबत  सहभागी झाला होता.

राधा यादव, स्मृती मानधना आणि अरुंधती रेड्डी यांनीही आपल्या स्टायलिश अंदाजाने लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.

जेमिमा रॉड्रिग्जने या कार्यक्रमातील  नीता अंबानींबतचा खास फोटो इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून शेअर केला आहे.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं साडीतील लूकनं सर्वांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.

रिलायन्स फाउंडेशनच्या या कार्यक्रमात राहुल द्रविडसह ICC अध्यक्ष जय शहा  यांनीही हजेरी लावली होती.

रोहित आणि सूर्यासह यशस्वी जैस्वाल आणि जसप्रीत बुमराहनं या  कार्यक्रमात स्टायलिश लूकची खास झलक दाखवून दिली.