हॉकीच्या जादूगारासंदर्भातील खास गोष्टी
हॉकीचा जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस (२९ ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
वयाच्या १६ व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाल्यावर ध्यान सिंग यांना ध्यानचंद हे नाव मिळाले.
ते रात्रीच्या वेळी चंद्र अन् चांदण्यांच्या प्रकाशात हॉकीचा सराव करायचे. त्यामुळेच त्यांना ध्यानचंद असे संबोधले जाऊ लागले.
अॅमस्टरडॅम येथील १९२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ध्यानचंद यांनी १४ गोल डागले होते. अन् याच कामगिरीनंतर त्यांना हॉकीचे जादूगार हे उपाधी मिळाली.
एकदा तर नेदरलँड्समधील सामनाधिकाऱ्यांनी चुंबक वैगेरे आहे का? ते तपासण्यासाठी त्यांची हॉकी स्टीक मोडून तपासली होती.
१९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय जादूगाराचा खेळ पाहण्यासाठी हॉकी स्टेडियमवर या. अशी पोस्टरबाजी करण्यात आली होती.
हिटलरनं ध्यानचंद यांना नागरिकत्वासह जर्मनीच्या सैन्यात उच्च पदावर नोकरीची ऑफर दिली होती. पण भारतीय दिग्गजाने त्याला थेट नकार दिला होता.