WPL च्या इतिहासातील ४ हॅटट्रिक 'क्वीन'

चौथ्या हंगामात चौथ्या हॅटट्रिकची नोंद

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील नंदिनी शर्मा हिने गुजरात विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिकचा डाव साधला.

WPL च्या चौथ्या हंगामात या स्पर्धेच्या इतिहासातील चौथ्या हॅटट्रिकची नोंद झाली.

इथं एक नजर टाकुयात नंदिनीशिवाय या स्पर्धेत हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांच्या खास रेकॉर्डवर..

नंदिनी शर्मा ही WPL मध्ये हॅटट्रिकचा घेणारी भारताची दुसरी गोलंदाज आहे. अनकॅप्ड खेळाडूनं आपल्या खास कामगिरीनं सर्वांच लक्षवेधून घेतलं आहे. 

WPL च्या इतिहासात पहिली हॅटट्रिक  इंग्लंडची इसाबेल वाँग हिच्या नावे आहे.  २०२३ च्या हंगामात MI कडून तिने UP वॉरियर्सविरुद्ध कमाल केली होती.

२०२४ च्या हंगामात दिप्ती शर्मानं UP वॉरियर्सकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध हॅटट्रिक घेतली होती.

२०२५ च्या हंगामात ग्रेस हॅरिस हिने UP वॉरिस्यकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हॅटट्रिक घेतल्याचे पाहायला मिळाले होते.

Click Here