इथंही धोनीनंच केलीये हवा..
आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक मॅचेस जिकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी टॉपला आहे.
धोनीनं वनडे आणि टी-२० दोन्ही प्रकारात १९ सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यात १४ सामन्या संघ विजयी ठरलाय.
रोहित शर्माच्या कॅप्टन्सीत टीम इंडियानं आशिया कप स्पर्धेत वनडे आणि टी-२० अशा दोन्ही फॉर्मेटमध्ये १५ पैकी ११ सामने जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.
दासुन शनाका याने श्रीलंकेच्या संघाचे संघाचे नेतृत्व करताना ११ पैकी ९ सामने जिंकले आहेत.
श्रीलंकेचा दिग्गज अर्जुन रणतुंगा याने १३ सामन्यात श्रीलंकेचे नेतृत्व करताना आशिया कप स्पर्धेत ९ सामने जिंकले आहेत.
मिस्बाह उल हक याने १० सामन्यात पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले असून यात त्याने २०१२ च्या जेतेपदासह ७ सामने जिंकले आहेत.
मोईन खान याने ६ पैकी ६ सामने जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने २००० चे जेतेपद पटकावले होते.
महेला जयवर्धने याने १० सामन्यात श्रीलंकेचे नेतृत्व केले असून यात ६ सामन्यात संघाला त्याने विजय मिळवून दिलाय.
मशरफे मुर्तुजा याने ११ सामन्यात बांगलादेश संघाचे नेतृत्व करताना ६ विजय नोंदवले आहेत.
मोहम्मद अझरुद्दीन याने आशिया कप स्पर्धेत ७ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना ५ सामने जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.
अँजेलो मॅथ्यूज याने श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करताना ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत.