या प्रवासात व्यायाम अन् आहार दोन्ही गोष्टी असतात महत्त्वपूर्ण
भारतीय क्रिकेटर सरफराज खान याने २ महिन्यात १७ किलो वजन घटवलं आहे.
क्रिकेटरचं कमालीचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन हे वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
इथं जाणून घेऊयात क्रिकेटरनं व्यायाम अन् योग्य आहारासह अशक्य वाटणारा प्रवास कसा सहज शक्य केला त्याबद्दल
सरफराजनं फॅट टू फिट होण्यासाठी जिममध्ये अधिक घाम गाळलाय. कार्डिओ आणि स्टेंथ ट्रेनिंगसह वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामावर जोर देतो.
कमी वेळेत अधिक कॅलरी बर्न करण्यासाठी क्रिकेटर हाई इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग (HIIT) वर भर दिलाय.
सरफराज खान याने उच्च प्रोटीनयुक्त फूड्स, जंक फूड आणि तेलकट पदार्थापासून दूर राहणे पसंत केले. भात आणि चपातीला तो हातही लावत नाही.
क्रिकेटरनं फळ भाज्या जसे की, ब्रोकली, गाजर, काकडी, सलाड आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश केला आहे.