आशिया कप २०२५ स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवनं यंदाच्या हंगामात ७ सामन्यात सर्वाधिक १७ विकेट्स घेतल्या आहेत.
UAE च्या जुनैद सिद्दीकी याने आपल्या गोलंदाजीतील जादू दाखवून देताना २ वेळा ४ विकेट्सचा डाव साधत ९ विकेट्स घेतल्या आहेत.
पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी याने ७ सामन्यात १० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
बांगलादेशच्या ताफ्यातील मुस्तफिझुर रहमान याने ६ सामन्यात ९ विकेट्सचा डाव साधला आहे.
पाकचा जलदगती गोलंदाज हारिस राउफ ५ सामन्यात ९ विकेट्स घेत टॉप ५ मध्ये असल्याचे दिसून येते.
प्रमुख बॅटरच्या रुपात खेळणारा अन् सपशेल अपयशी ठरलेल्या पाकच्या सईम अयूब याने ७ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत.
पाकचा बॅटर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहवर भारी पडलाय. भारताच्या स्टार गोलंदाजानं ५ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या आहेत.