T20I मध्ये यंदाचं वर्ष गाजवणारे भारताचे ७ गोलंदाज

भारतीय संघाकडून फिरकीपटूंची हवा 

२०२५ हे वर्ष वरुण चक्रवर्तीसाठी खास राहिली आहे. १४ आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात त्याच्या खात्यात २५ विकेट्स जमा आहेत. 

यंदाच्या वर्षात भारताकडून यशस्वी ठरलेल्या गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ९ T20I सामन्यात १९ विकेट्स घेतल्या आहेत. 

भारताचा अष्टपैलू  अक्षर पटेलच्या खात्यात आतापर्यंत १५ सामन्यात १२ विकेट्स जमा आहेत. 

टी-२० मधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या अर्शदीप सिंगनं यंदाच्या वर्षात ६ T20I सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमराहनं  ८ सामन्यात ९ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. 

हार्दिक पांड्या  ११ सामन्यात ९ विकेट्स घेत अव्वल सात गोलंदाजाच्या यादीत टिकून आहे.

अष्टपैलू शिवम दुबे याने ११ सामन्यात ८ विकेट आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. 

 चक्रवर्तीसह बुमराह, अर्शदीप, दुबे आणि अक्षर पटेल यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील उर्वरित दोन सामन्यात आपली आकडेवारी अधिक भक्कम करण्याची संधी आहे.

Click Here