किंग कोहलीला जैसा कोई नहीं...
वनडेत सलग पाच सामन्यात 'फिफ्टी प्लस'चा डाव साधण्यात कोहली नंबर वन आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा षटकार हुकला.
पण तुम्हाला माहितीये का? वनडेत सलग पाच सामन्यात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम हा किंग कोहलीच्याच नावेच आहे.
विराट कोहलीनं आतापर्यंतच्या आपल्या वनडे कारकिर्दीत पाच वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे.
वनडेत सलग पाच सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे.
राहुल द्रविडनंही आपल्या वनडे कारकिर्दीत अशी कामगिरी करून दाखवल्याचा विक्रम आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील वनडेत सलग पाच सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा डाव साधला आहे.
हिटमॅन रोहित शर्मानंही आतापर्यंतच्या वनडे कारकिर्दीत एकदा हा डाव साधला आहे.