शनाका नवा 'सिक्सर किंग'; हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील खास रेकॉर्ड

पाक विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका याने ३४ चेंडूत  २ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने  ७६ धावांची धमाकेदार खेळी केली.

श्रीलंकेनं ५ धावांनी सामना गमावल्यामुळे त्याची खेळी व्यर्थ ठरली. पण या खेळीत त्याने नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. 

दसुन शनाका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक षटकार माणारा कर्णधार ठरला आहे. त्याने रोहित शर्माला मागे टाकले. 

दसुन शनाकाने श्रीलंकेचे नेतृत्व करताना वर्ल्ड कप स्पर्धेत २१ षटकार मारत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. 

रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाची कॅप्टन्सी करताना हिटमॅनच्या बॅटमधून १९ षटकार पाहायला मिळाले आहेत.

ख्रिस गेलनं वेस्ट इंडिजचे नेतृत्व करताना वर्ल्ड कप स्पर्धेत १७ षटकार मारल्याचा विक्रम आहे. 

इंग्लंडच्या जोस बटलरनं कॅप्टन्सीत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १७ षटकार मारले आहेत.

एमएस धोनी या यादीत १६ षटकारांसह आघाडीच्या पाच कॅप्टन्सच्या यादीत आहे.   

Click Here