अभिषेक टॉपला; आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

कुणी त्याच्या आसपासही दिसत नाही

अभिषेक शर्मानं यंदाच्या आशिया कप स्पर्धेत ३ अर्धशतकाच्या मदतीने ७ सामन्यातील ७ डावात ४४.८६ च्या सरासरीनं ३१४ धावा कुटल्या आहेत. 

या कामगिरीसह त्याने टी-२० आशिया कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका याने ६ सामन्यातील ६ डावात एका शतकासह ४३.५० च्या सरासरीसह २६१ धावा कुटल्या आहेत.

बांगलादेशचा सलामीवीर सैफ हसन याने ४ सामन्यातील ४ डावातील १७८ धावा केल्या आहेत.  तिलक वर्मानं त्याला मागे टाकल्याचे पाहायला मिळाले,

पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान ७ सामन्याील ७ डावात २१७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

कुसल परेरानं ६ सामन्यातील ६ डावात २४.३३ च्या सरासरीनं १४६ धावा केल्या आहेत. 

भारताच्या तिलक वर्माला फायनलमधील खेळीसह एका दमदार खेळीसह तिघा चौघांना एकाच दणक्यात मागे टाकण्याची संधी होती अन् ते त्यानं करून दाखवलंय.

तिलक वर्मा ७ सामन्यातील ६ डावात ७१ च्या सरासरीसह त्याने २१४ धावा कुटल्या आहेत. 

Click Here